बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 14 एप्रिल 2016 मध्ये ई-नाम (E-NAM) किंवा राष्ट्रीय कृषी बााजार या पोर्टल ॲपची सुरुवात केली होती. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना शेतीमालाची थेट विक्री करता यावी अशी सरकारची योजना होती. या योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. शिवाय या योजनेत 257 शेती उत्पादक कंपनीनेही समावेश घेतला आहे.

ई- नाम या ॲपद्वारे शेतकऱ्यांना देशातल्या कोणत्या बाजारपेठेत शेतीमालाचे काय दर आहेत याची माहिती घेता येते. शिवाय शेतीमालाची विक्री कोणत्या बाजारपेठेत विक्री करायची?  हे ही ठरवता येते. यामुळे शेतकरी कोणत्या बाजारपेठेत किती दर आहे हे पाहून माल कुठे विकायचा? हे ठरवू शकतात. या योजनेत 21 राज्यातील शेतकरी समाविष्ट झाले आहेत.

या पोर्टलमध्ये 257 उत्पादन कंपन्या, 20339 व्यापारी आणि महाराष्ट्रातील 16 हजार 504 कमिशन एजंट सहभागी आहेत.  या ॲपसोबत 118 मंड्या जोडल्या आहेत. याशिवाय मोदी सरकारने ‘ई-नाम’ पोर्टलअंतर्गत देशात 1000 मंड्याची वाढ केली आहे. या पोर्टलवर देशातील सुमारे 2 हजार 700 कृषी उत्पन्न बाजार समित्या 4 हजार उपबाजार समित्या आहेत.

या पोर्टलमध्ये आतापर्यंत देशातील 1 कोटी 71 लाख 99 हजार 63 शेतकऱ्यांना सहभाग नोंदवला आहे. तर, महाराष्ट्रातील 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता देशातील सर्वच शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी ‘ई-नाम’ हे ॲप प्ले- स्टोअरवर उपलब्ध आहे.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्र वसूली संस्कार’; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे”

द.आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या ‘त्या’ कोरोना रूग्णाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

‘लॉकडाऊन नको असेल तर…’, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More