बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण वेळेत शाळा सुरू होण्याची कमी शक्यता आहे. आता ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. मात्र ऑनलाईन शिकवणीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे पुर्ण अभ्यासक्रम शिकवणं शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुध्दा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादेमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाच्याची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वीपर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत. याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती जाहीर करण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

“…अन्यथा मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करेल”

“यांना लाजा वाटत नाही का?, एवढी मोठी दुर्घटना घडली तरी एक अधिकारी घटनास्थळी नाही”

राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रसिद्ध ZP शाळा वाबळेवाडीच्या शिक्षकांचे राजीनाम

“संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणं हे राज्याचं दुर्दैव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More