Top News महाराष्ट्र मुंबई

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मेट्रोच्या कामावर काही परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का?, या पर्यायाची पडताळणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक’, अशी टीका शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, “मेट्रोला गिरगावात विरोध केला मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!”

दरम्यान,  आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव आखला जात असल्याचा आरोपही शेलारांनी केला आहे.


थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…

“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि मिळवा एक लाखाचं बक्षीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या