पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
मुंबई | राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जाणार आहे. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगळता बाकी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यात आलं होतं. आता यावर्षी देखील कोरोनाचा उद्रेक पाहता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आरटीईच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेत आहोत. यासर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपण प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, परंतू कोरोनामुुळे ते शक्य झालं नाही, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
आपल्याला माहित आहे राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्युब याच्या माध्यामातून शिक्षण सुरू ठेवलं. पहिले ते चौथीच्या शाळा या शाळेमध्ये सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या. परंतू काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या काही ठिकाणी त्या सुरू होऊ शकल्या नाहीत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला
‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध
रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित
“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”
मी भारताचा पंतप्रधान असतो तर…- राहुल गांधी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.