बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ मोठे संकेत

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्दयावरून राजकारण पेटलं होतं. अशातच आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (SC) नकार दिला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात, असा आदेश देखील दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी जोपर्यंत डाटा तयार होत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, निवडणुका या विनाआरक्षण म्हणजेच खुल्या गटातून होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतर निवडणुका घेतल्या जातील. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला हा आणखी एक धक्का असल्याचं मानलं जातंय.

दरम्यान, मंत्रिमंडळच्या बैठकीत पास झालेला ठराव हा निवडणूक आयोगाला पाठवला जाणार असल्याची माहिती ओबीसी नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय”; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

‘ती’ वाईट बातमी आली अन् राजनाथ सिंहांनी भाषण थांबवलं

पोर्नोग्राफी केस: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयाचा मोठा दिलासा

83च्या ‘त्या’ मिस्ट्री बाॅलची कहाणी 38 वर्षांनंतरही उलघडली नाही; पाहा व्हिडीओ

“शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More