बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

मुंबई | राज्यातील विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात पार पडलं. अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालत सभागृहातील अध्यक्षांचा माईक हिसकावला होता. भाजपच्या 12 आमदारांचे सभागृहात गैरवर्तन केल्यामुळं एक वर्षासाठी निलंबन केलं होतं. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळं राज्यसभेची पोटनिवडणुक होणार आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडुकीमध्ये भाजपच्या 12 निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय निवडणुक आयोगाकडून भाजपच्या 12 निलंबित आमदारांना मतदान करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला या 12 आमदारांचा फायदा होणार आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणुक आयोगाकडून राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळी अधिवेशना दरम्यान तालिका अध्यक्षांच्या खुर्ची जवळ भाजप आमदारांनी गोंधळ घातला होता. तसेच अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन आमदारांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. या 12 निलंबित आमदारांमध्ये आशिष शेलार, गिरीश महाजन, राम सातपुते यांच्यासह अन्य 9 आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या पोटनिवडुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नाही. या पोटनिवडुकीसाठी 4 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी मतमोजणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना आपल्या जन्माच्या आधीपासुनच होता- उदयनराजे भोसले

‘आमच्या आंदोलनानंतर इंदोरीकर महाराजांची 80 टक्के कीर्तने…’; बिग बॉसमध्ये तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

टीईटी परीक्षा पुढे ढकलली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली नवीन तारीख

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More