बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार ; मद्रास उच्च न्यायालयाचा संताप

चेन्नई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणुका होतील की नाही अशी, शंका उपस्थित केली जात होती.मात्र, निवडणूक आयोगाने केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगाल या पाच विधानसभेच्या निवडणूक जाहीर केल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. आता या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मद्रास उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. संवैधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचं स्मरण करुन द्यावं लागतं हे दुर्देव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जिवंत असेल तरच तो त्याच्या लोकशाही अधिकाराचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही मद्रास उच्च न्यायालयाने केला आहे. सुनावणीवेळी आरोग्य सचिवांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही दिले आहेत.

देश कोरोनाशी लढा देत असतानाही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,  असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायाधीश न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

दरम्यान, पाच राज्यांत येत्या 2 मे ला निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावाने मतमोजणी थांबवू, असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई?; मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More