Election Commission | राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. तर 23 तारखेला मतमोजणी झाली. यात महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. यानंतर निकालाच्या आकडेवारीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अनेक उमेदवारांनी देखील अधिक मतदान झाल्याचा आरोप केला. तसेथ बुथवरील एकूण मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याचा आरोपही काही उमेदवारांनी केलाय. याबद्दल निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या आकडेवारीचा हवाला देऊन अनेकजण या आकडेवारीतील तफावत दाखवून देत होते.
विरोधकांचा गंभीर आरोप
राज्यात विरोधी वातावरण असतांना देखील असे निकाल येणे धक्कादायक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. विरोधकांनी निवडणूक आयोगाला देखील सुनावलं. तसेच आयोगाने यावर उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोग (Election Commission) पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देत असतं. पण विधानसभा निकालानंतर असं काही झालं नाही. अखेर वाद वाढत असताना निवडणूक आयोगाने एक्सवर ट्विट करत माहिती दिली आहे. यात काही आकडेवारी सांगितली आहे तसेच एक बातमी देखील शेअर करण्यात आलीये.
कमेंट सेक्शन केला बंद
मतदान मोजणीच्या आकड्यात तफावतीच्या कुठेही तक्रारी नाहीत, असा मथळा असलेली ही बातमी ‘चिफइलेक्टोरलऑफिस’ या एक्स अकांटवरून ट्विट करण्यात आली आहे. या बातमीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी निकालावर भाष्य केलं. आकडेवारीत तफावत असल्याच्या कुठेही तक्रारी नसल्याचं त्यांनी यात म्हटलंय. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं. तसेच फक्त याच ट्विटचं कमेंट सेक्शनही बंद करण्यात आलं आहे. यावर कोणत्याही व्यक्तीला प्रतिक्रिया देणं किंवा प्रश्न विचारता येत नाहीये.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ @ECISVEEP @SpokespersonECI @MahaDGIPR #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/loO9f33Dho
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) November 27, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी मोठा….”
मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर; वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
ऐश्वर्याच्या चाहत्यांना धक्का, घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब!
भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?