बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

जयपूर | राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे.

कोरोनामुळे 12 तासात आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरूणी ही B.Tech. डिग्री होल्डर होती. संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होते. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.

संगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. संगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून परत आल्यावर त्या आजारी पडल्या. मुलगी संगीताही रुग्णालयात होती. यावेळी मुलीची तब्येतही खालावली. जवळपास 12 दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. नंतर आणखी प्रकृती खालावल्याने या दोन्ही मायलेकींनी प्राण सोडले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडल्याची धक्कादायक घटना घडली. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्येही एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा

लाईव्ह शो चालू असताना झाला बॉम्बब्लास्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खळबळजनक! पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा आढळला मृतदेह

“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More