बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानसोबत दिसलेल्या ‘या’ भाजप नेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | आर्यन खानच्या अटकेनंतर देशातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. त्यामुळे आता अनेकांची आरोप-प्रत्यारोपांची खेळी पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यनसोबत असणाऱ्या व्यक्तीविषयी आरोप केले आहेत.

2 ऑक्टोबरला आर्यन खानसोबत असणारी ती व्यक्ती पोलीस ऑफिसर नसून भाजप नेते मोहन भानूशाली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर मोहन भानूशाली यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडिमार केला गेला. अशातच आता मोहन भानूशाली यांनी समोर येत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. भाजपचा याच्याशी काहीही संबंध नाही. मला 1 ऑक्टोबरला माहिती मिळाली होती की, ड्रग्ज पार्टी होणार आहे. त्यामुळे मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत अजून माहिती मिळवण्यासाठी क्रुझवर गेलो होतो.’, असं मोहन भानूशालीनं एनआयशी बोलताना म्हटलं.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हळूहळू राजकीय वळण घेताना दिसत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे. आता यात आणखी काय नवीन वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

‘या’ पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 27 जण रुग्णालयात

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More