भारतातील ब्लड प्रेशर रूग्णांबाबत अभ्यासातून धक्कादायक खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतात ब्लड प्रेशरच्या रूग्णांचं(BP) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात न राहण्याची अनेक कारणं आहेत. जेवण वेळेत न करणे, तणाव,थकवा ही प्रमुख कारणं बीपी नियंत्रणात न राहण्याची मानली जातात. जेवणात मिठाचा जास्त वापर केल्यास देखील बीपी नियंत्रणात राहत नाही.

तसेच बीपी नियंत्रणात नसण्याचे प्रमाणही, भारतात मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच बीपीच्या नियंत्रणाच्या दराबद्दल, अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र येथील संशोधकांनी 2001 पासून प्रकाशित झालेल्या 51 अभ्यासांचा आढावा घेतला आहे. या अभ्यासाच्या आधारे येथील संशोधकांनी बीपी नियंत्रणाचा दर जाहीर केला आहे.

त्यानुसार, संशोधकांना असं आढळलं आहे की, 2016 -2020 या वर्षांत बीपी नियंत्रणात असल्याचा दर भारतात एक चतुर्थांपेक्षा कमी होता. पण गेल्या दोन वर्षात या दरात सुधारणा झाल्याचंही आढळून आलं आहे. तसेच संशोधनातील काही अभ्यासांमध्ये असंही आढळून आलं आहे की, 41 टक्के महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त आहे. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये नियंत्रणाचे प्रमाण फार कमी आहे.

तुम्ही आपल्या जीवनशैलीत बदल करून बीपी नियंत्रणात ठेऊ शकता. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही जंक फूडचे सेवन टाळले पाहीजे. व्यायाम करणं ही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची महत्वाची पायरी आहे. शरीराची हालचाल झाली की रक्त शरीरातील सर्व भागांमध्ये पोहचते. तसेच बीपीची नियमीत तपासणी करून घेणंही गरजेचं आहे.

बीपीची लक्षणं लवकर ओळखून उपचार घेणंही महत्वाचं असतं. श्वास घेण्यास त्रास होणं, छातीवर भार असल्यासारखं वाटणं, नाकातून रक्त येणं, सतत चक्कर येणं, डोकं दुखणं ही बीपी वाढण्याची प्रारंभिक लक्षंणं आहेत.

दरम्यान, उच्च रक्त दाबाचे प्रायमरी ब्लड प्रेशर आणि सेंकडरी ब्लड प्रेशर असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकार घातक असून वेळीच उपचार घेणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-