बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

कोल्हापूर | छोट्या पडद्यावरील मालिका तुझ्यात जीव रंगलामधील वहिनीसाहेब उर्फ धनश्री काडगावकर हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर चाहत्यांची तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ती बऱ्याचदा सोशल मीडियावर बाळाबद्दल चाहत्यांना अपडेट देत होती.

अखेर धनश्रीने बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळाचं बारसं नुकतच पार पडलं आणि त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. धनश्री काडगावकर हिने इन्स्टाग्रामवर बारशाचे फोटो शेअर करत लिहिले की, बाळाचं बारसं झालं असून नाव ठेवलं “कबीर.”

धनश्री काडगावकरच्या बारशाच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कबीर या नावाला सोशल मीडियावर पसंती मिळते आहे. धनश्री मुळची पुण्याची आहे. तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीने लग्न केले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली.

दरम्यान, धनश्रीने विविध नाटक आणि चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

पाहा फोटो :

थोडक्यात बातम्या-

“आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे मंत्री एकत्र येतात अन् मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात”

“…त्यामुळे 2024 साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत मोदींनी खुलासा करावा”

मेंदूवर परिणाम करणारा दुर्मिळ कोरोना; ‘या’ राज्यात सापडला पहिला रूग्ण

“फडणवीस म्हणाले होते, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”

नवऱ्याने अन् घरातल्यांनी साथ सोडली, 6 महिन्याच्या मुलासह घराबाहेर पडलेली महिला बनली पोलीस उपनिरीक्षक

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More