बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

औरंगाबाद | ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्णय घेतले आहेत, ते हास्यास्पद वाटतात. लग्न, समारंभावर बंदी घातली. मात्र, दुसरीकडे कारखाने, मोठे उद्योग सुरु राहणार आहेत. म्हणजे मास्क घालून लग्न समारंभांना शंभर व्यक्तींनी हजेरी लावली तर चालणार नाही. पण एकाच कारखान्यात पाचशे कामगार एकत्र आले तर प्रशासनाला चालेल. हा अजब प्रकार आहे, अशी सडकून टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बहूदा कोरोना विषाणू सोबत बैठक झाली असावी, आणि त्यात कोरोनाने मी कूठल्या दिवशी, कुठे येईल किती वाजता येईल हे त्यांना सांगितले असावे. त्यामुळे शनिवार, रविवार अंश:त बंदचा निर्णय घेण्यात आला असावा. असा टोला खासदार इप्तियाज जलील यांनी प्रशासनाला लगावला आहे. अंश:त लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर जलील यांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करणारी प्रतिक्रिया फेसबूकच्या माध्यमातून दिली.

शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतला प्रशासनाने काल काही निर्णय घेतले. यात प्रामुख्याने 11 मार्च ते 4 एप्रिल शनिवार आणि रविवार संपुर्ण लाॅकडाऊनसह विविध निर्णयांचा समावेश आहे. काहीजणांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले तर तर राजकीय पक्षांकडून समिश्र प्रतिक्रिया आल्या. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या निर्णयावर आपली वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जिल्हा प्रशासनाने अंश:त लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही वेळातच इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुकवरुन या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. इम्तियाज जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक बैठक कोरोनासोबत नुकतीच पार पडली. त्यातुन त्यांनी शनिवार आणि रविवार पुर्ण लाॅकडाऊनची घोषणा केली. बहुदा कोरोना विषाणूने प्रशासनाला एक विस्तृत कार्यक्रम दिला आहे. त्या नुसार कोरोना विषाणू कुठे, केव्हा, कधी हल्ला करणार यांचे वेळापत्रक दिले असावे, अशी तिखट प्रतिक्रिया जलील यांनी दिली.

थोडक्यात बातम्या –

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्तर

महिला दिनानिमित्त पहिल्यांदाच महिला खासदारांना संसदेत बोलण्याची संधी

ठाकरे सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं?, पाहा एका क्लिकवर!

“मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More