बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

सिल्वासा | राज्यात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यापासून दोन्ही पक्षातील दरी वाढताना दिसत आहे. दादरा नगर हवेली या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या प्रचार जोरात रंगताना दिसत आहे. या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. राज्याचे मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिल्वासामध्ये कलाबेन डेलकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आहे. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल सिल्वासामध्ये भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली आहे. त्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, काल इथं महाराष्ट्रातून कोणीतरी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. तसेच ते महाराष्ट्रात निवडणुकीवेळी इथं एवढे कोटी, तिथं एवढे कोटी दिले असल्याचं सांगत फिरत असतात, असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेतला आहे.

आम्ही इथं पक्ष वाढवण्यासाठी नाहीत. आम्ही गोव्यात गेलो राजस्थानमध्ये गेलो. ही लढाई न्यायहक्कासाठी आहे. डेलकर कुटूंबसाठी असेल किंवा दादरा नगर हवेलीसाठी असेल. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह असतो तो मी आज पाहिला आहे. मी डेलकर कुटूंबाचे मी इथं काम पाहिलं आहे. योगदान पाहिलं आहे. जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बदला हा शब्द योग्य की अयोग्य आहे मला माहित नाही. पण न्यायहक्कासाठी ही लढाई सुरू आहे. मी कलाबेन आणि अभिनव यांच्याशी बोलत होतो. त्यांच्याही हीच भावना आहे की, इथं जनतेवर हुकूमशाही सुरू आहे. ती मोडून काढली पाहिजे. शिवसेना नेहमीच हुकूमशाही आणि अन्यायाविरूद्ध लढलेली आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

“टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय”

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More