नवी दिल्ली | भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. या घटनेने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर देखील हळहळाय.
या घटनेची माहिती मिळताच शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिलीये. शोएब सोबत अनेक पाकिस्तानी नागरिकांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
यासंदर्भाच शोएबने ट्विट केलंय. तो म्हणतो, “महाराष्ट्रातील एका सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागली. या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे.”
भंडाऱ्यातील या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दु:ख व्यक्त केलं.
थोडक्यात बातम्या-
आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी
येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार
पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…
‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी
सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!