बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार मदत”

नाशिक | नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन 22 जणांचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये मृत झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून  मदत करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ही घटना दुर्दैवी आहे. मी नाशिकच्या महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे. त्यांनी घटनेची माहिती दिली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. मी नाशिकला जात असून, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अगोदरच घटनास्थळी गेले असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. राजेश टोपे नाशिककडे रवाना झाले असून त्यांनी जाताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यानं झालेल्या दुर्घटनेची बातमी ऐकून व्यथित झालो. या घटनेत ज्यांनी नातेवाईक गमावले आहेत ही त्यांच्यासाठी कधीच न भरुन येणारी आहे. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. इतर रुग्ण बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असं राज्याचे राज्यपाल भगरसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

थोेडक्यात बातम्या- 

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी ‘सीरम’ने जाहीर केल्या कोविशिल्ड लसीच्या किंमती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More