बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

नवी दिल्ली | जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कित्येक लोकांना या महामारीमुळे आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोनामुळे उद्धवस्त झाली आहेत. अशातच आता केंद्र सरकारनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे देशातील लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिल्यास सरकारचं नुकसान होईल. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यास केंद्राने नकार दिला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या दबावानंतर केंद्राने मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची भरपाई देण्यास होकार दर्शवला आहे. याविषयी एनडीआरएफने म्हटलं आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल.

भरपाई मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात अर्ज करावा लागेल. भरपाईचा हा पैसा राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या SDRF द्वारे दिला जाईल. भरपाई मिळवण्यासाठी पुरावा म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या –

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

शिवसेनेशी पंगा नंतर फोन, आता थेट भेट; अमित शहा आणि राणेंमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More