रत्नागिरी | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा संघर्ष वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून कुटूंबियांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे भाजपच्या मैत्रीचा विषय येतो कुठे?,असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे.
कोकणात जिथे जाईल तिथे शिवसेना आहे. काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली आहे. मुंबई, कोकण आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल?,याचा विचार शिवसैनिक करत असतो. 10 वर्षांपूर्वी आपण यायचो त्यावेळेस राजकीय लढा आपण देत होतो. आता जमीन आसमानाचा फरक आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
कोकणात पुढील पाच वर्षांमध्ये सिंधुरत्न योजनेमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असेल. कोकणामध्ये होम स्टे पॉलिसी आणणार आहोत. येथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळेल यावर आमचा भर असणार आहे. मुंबईवरचा भगवा हा कोकणी माणसांमुळेच आहे. नाणार होणार नाही म्हणजे नाही, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे.
दरम्यान, आपलं सरकार बनल्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री या तिघांनीही ठरवलं आहे की, कोकणाला आपण वर्षानुवर्षे पर्यटनाचा दर्जा दिला आहे. पण इतक्या वर्षात पर्यटनाचा विकास झाला का?, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण दोन्हीही महत्त्वाचे आहेत. माझी दोन्ही खाती कोकणासाठी महत्त्वाची आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
पुढच्या टार्गेटवर कोणता मंत्री असणार?, किरीट सोमय्या म्हणाले….
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर
मोठी बातमी ! मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना मोठा दिलासा
अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार?, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
Comments are closed.