एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वीच तब्बल 18000 कोटी मोजून टाटा सन्सने त्यांच्या एअर इंडियन्सवर पुन्हा ताबा मिळवला आहे. यानंतर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.

टाटा समूहने एअर इंडियाला खरेदी केल्यानंतर या करारा अंतर्गत टाटा समूह विमान कंपनीने 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडलं आहे. तसेच टाटा समूहाकडून सरकारला 2700 कोटी रोख मिळतील. टाटा सन्सने एअर इंडियावर ताबा मिळवला असून यावेळी त्यांनी जेआरडी टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

1932 साली एअर इंडियाची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली होती. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1953मध्ये एअर इंडिया भारत सरकारच्या ताब्यात गेली होती. त्यानंतर आता तब्बल 68 वर्षानंतर एअर इंडियाने पुन्हा मालकी मिळवली आहे.

दरम्यान, एकेकाळी भारत सरकारची आर्थिक स्त्रोत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात होती. कंपनीच्या आणि केंद्राच्या आर्थिक संकटाला हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

18000 crore18000 कोटीAir IndiaLatest NewsMarathi Newson trackPlaneStruggleएअर इंडियाट्रॅकवरताज्या बातम्यामराठी बातम्याविमानसंघर्ष