बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चाहता फोटो काढायला आला अन् किस करुन गेला, अभिनेत्री झाली हैराण

मुंबई | बिग बॉस या कार्यक्रमामुळंं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अर्शी खान तिच्य वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. त्यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी ती कुठल्याही वक्तव्यामुळं नव्हे तर तिच्या एका चाहत्यामुळं चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यानं फोटो काढण्याच्या बहाण्यानं सर्वांसमोर अर्शीला किस केलं आहे.

विमानतळावर घडलेल्या या अजब घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्शी नुकतीच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेली होती. त्यावेळी विमानतळावर तिची भेट एका चाहत्याशी झाली. खरं तर कोणीही ओळखू नये म्हणून तिनं बुरखा घातला होता. मात्र, तरीसुद्धा एका चाहत्यानं तिला ओळखलंच.

शेवटी चाहत्याच्या आग्रहास्तव ती त्याच्यासोबत फोटो काढायला तयार झाली. मात्र, या चाहत्यानं फोटोचं निमित्त साधून सर्वांसमोर अर्शीचा हात हातात घेत किस केलं. त्याची ही कृती पाहून अर्शी देखील काय बोलावं? या विचारानं गोंधळली होती. मात्र, ही घटना तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, बिग बॉसनंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अर्शी का स्वयंवर हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती एका तरुणाला निवडेल अन् त्याच्यासोबत लग्न करेल. अर्थात हे लग्न राखी सारखंच खोटं असेल की खरं हे पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

थोडक्यात बातम्या

फायनलच्या पराभवाचा बदला घेण्यास दिल्ली तयार, कोण जिंकणार आजचा सामना??

कोंबड्या अंडी देत नाही म्हणून पोल्ट्री मालकाची पोलिसात धाव; प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड

मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्राला मिळणार होता पण…”

“बात निकली है तो दूर तक जायेगी”; रोहिणी खडसेंना भाजप नेत्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More