Top News

कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

अमरावती | कर्जमाफी न मिळाल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपली 4 एकर शेती मुख्यमंत्र्यांच्या नावे केली आहे. प्रमोद कुटे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते दर्यापूरचे रहिवासी आहेत. 

कुटे यांनी आधीच्या कर्जाचा भरणा करुन नवं कर्ज काढलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवले. राज्य शासनाला पत्रंही पाठवली, मात्र कर्जमाफी मिळाली नाही.

दरम्यान, वैतागलेल्या कुटे यांनी आपली 4 एकर शेती 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून मुख्यमंत्र्यांच्या नावे केली. तसेच तो स्टँप पेपर मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या