मुंबई | अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने अनोखी शिक्षा ठोठावली.
आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना कोर्ट सुटेपर्यंत कोर्टात बसून राहाणं आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने हा निर्णय दिला.
शिक्षा संपल्यानंतर कोर्टातून बाहेर जात असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 80 वर्षीय शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवली.
दरम्यान बच्चू कडू यांच्या बाबतीत हा दुसऱ्यांदा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मागच्या 8 महिन्यांपूर्वी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केल्यानंतर बऱ्याच आमदारांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-