बंगळुरू | शेतीत राबराब राबून शेतकरी कष्टाने आपले जीवन जगत असतो. श्रमप्रतिष्ठा असल्याने शेतकरी समाजामध्ये सन्मानाने राहतो. परंतु, शेतकऱ्याला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला अक्कल घडविल्याशिवाय राहत नाही. अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याने कार शोरूममधील एका कर्मचाऱ्याला अद्दल घडवली आहे.
ही घटना कर्नाटक राज्यातील तुमाकरू येथे घडली आहे. केम्पेगौडा आर. एल हा शेतकरी आपल्या काही मित्रांसोबत तुमानुरू येथे एका कारच्या शोरूममध्ये गेला असता तेथील कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला हिणावलं. खिशात दहा रूपये तरी आहेत का? आणि कार खरेदी करायला निघाला, असं म्हणत कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना शोरूम बाहेर हाकलून दिले. या घटनेसंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.
शोरूममधून बाहेर काढल्याचा राग धरत जिद्दीला पेटून शेतकऱ्याने अवघ्या 30 मिनिटांमध्ये तब्बल 10 लाख रूपये कर्मचाऱ्यासमोर ठेवले. शेतकरी आणि कर्मचारी यांच्यात पैज लागली होती. जर शेतकऱ्याने 30 मिनिटांच्या आतमध्ये पैसे आणले तर कर्मचाऱ्यालाच शेतकऱ्याच्या घरी कार नेवून लावावी लागेल, असं पैैजेमध्ये ठरले होते. सदर घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर शनिवार आणि रविवार आल्याने कार विकणाऱ्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला कार दिलीच नाही.
दरम्यान, कर्मचाऱ्याने हिणवल्यामुळे शेतकरी चांगलाच जिद्दीला पेटला होता. ठरलेल्या पैजेनुसार कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला कार दिली नाही. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली. तसेच जोपर्यंत कर्मचारी माफी मागत नाही तोवर कारचे शोरूम सोडण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. माफी मागितली नाही तर शोरूम समोर आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट येणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
“…तर अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू”
“लफडी करताना मला विचारलं होतं का?”; नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल
भाजपला सर्वात मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
Comments are closed.