बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC Result | आई-वडिलांच्या कष्टाचं पोरीनं चीज केलं; शेतकऱ्याची लेक बनली IAS

नवी दिल्ली | देशातील विद्यार्थ्यांसाठी युपीएससीत यश मिळवणं हे स्वप्न असतं. देशातील 752 विद्यार्थ्यांचं स्वप्न काल पुर्ण झालं आहे. देशभरातून लाखो विद्यार्थ्यांमधून अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.

उत्तर प्रदेशातील सिरसा गावातील शेतकरी कन्या हिमानी मिना हिने देशातून 323 वा क्रमांक मिळवून युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलीनं दैदीप्यमान यश मिळवल्यानं देशभरातून हिमानीच कौतूक करण्यात येत आहे. हिमानी मिना ही दिल्ली विद्यापिठाची विद्यार्थीनी आहे. दिल्ली विद्यापिठातून हिमानी बीए उत्तीर्ण झाली आहे.

देशातील मानद विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून हिमानीने  विदेश विषयांत पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केलं आहे. लहानपणापासूनचं देशातील प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न हिमानी आणि तिच्या घरच्यांनी पाहिलं होतं. हिमानीचे वडील शेतकरी तर आई गृहीणी आहे. हिमानीच्या या यशाने सिरसा गावातील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

हिमानी मिना हिचं शिक्षण 12 पर्यंत गावातच झालं आहे. गावातील शाळेत शिकून हिमानीनं देशसेवेत जाण्यासाठी युपीएससीचा पर्याय स्विकारला आणि तो यशस्वी सुद्धा करू दाखवला आहे.

थोडक्यात बातम्या 

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

“पालकांनो तुमचा मुलगा मुलगी काय करते याकडे लक्ष द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More