बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगानं आली, तितक्याच वेगानं जाणार”

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात क्रेडीट सुईस यांच्या संशोधनातून एक आनंदाची बाब समोर आली आहे. कोरोनाची लाट जेवढ्या वेगाने पसरली तोवढ्याच वेगाने ती ओसरणार असल्याचं क्रेडीट सुईस यांच्या संशोधनातून समोर आलं आहे.

संबंधित संशोधनानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरला भारतीय लोकसंख्येतील 40 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतील. मागील वर्षी डिसेंबर महिना अखेरीस देशातील 21 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस हे प्रमाण वाढत जाऊन यामध्ये आणखी 7 टक्क्यांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लसीकरण मोहिमेमुळे आतापर्यंत जवळपास 12 टक्के जनतेमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं देशातील 40 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यापासून दूर असेल.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. तसेच गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. त्यामध्ये 24 टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन सापडला असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात देण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

‘केंद्र सरकारने कंपन्याना महाराष्ट्रात रेमडेसिवीर न पुरवण्यास सांगितलंय’; नवाब मलिक यांचा धक्कादायक खुलासा

वसंत मोरेंनी हॉटेलमध्ये 40 ऑक्सिजन बेड उभारले, पुण्याच्या नगरसेवकांना दाखवला आरसा

19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; कारण ठरली मामाची पोरगी

‘गिधाडांनो त्या कार्तिकला एकटं सोडा; आता त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका”

देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका- संजय राऊत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More