पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे एका पित्याने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसून आर्थिक स्थितीला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचल्याचं कळतंय.
तळेगाव ढमढेरे येथे राहणाऱ्या राजेंद्र भुजबळ यांनी गुरूवारी सकाळी आपल्या दोन मुली दिक्षा भुजबळ आणि ऋतुजा भुजबळ यांच्या सोबत विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तळेगाव ढमढेरे येथील उत्तम भुजबळ यांच्या शेणाचा मळा जवळील विहिरीच्या कडेला तीन चपला आढळून आल्या. त्यामध्ये दोन लहान मुलींच्या चपलासुद्दा होत्या, त्यावरुन त्या चपला त्या बाप-लेकींच्या असाव्या असा अंदाज आला. तसेच त्या चपलांबरोबर मोबाईल आणि पैसे देखील सापडले. त्यामुळे ही भयंकर घटना समोर आली.
या घटनेमुळे तळेगाव ढमढेरे गावात शोककळा पसरलीये. बापलेकींच्या या सामुहिक आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. तसेच या सामुहिक आत्महत्येमुळे गावातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोलीसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू अशी केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजेंद्र भुजबळ यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. कोरोनामुळे राजेंद्र भुजबळ यांना काम मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा खर्च भागवणं अवघड होत चाललं होतं. कदाचित म्हणून त्यांंनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
थोडक्यात बातम्या-
भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!
“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”
संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स
“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”
देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.