बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

पाटना | देशात अनेक निवडणुकांमध्ये रक्ताचे नाते एकमेकांच्या विरोधात लढलेले पाहायला मिळते. कधी भाऊ-भाऊ तर कधी सासरा सुन अशी एक ना अनेक नात्यांमध्ये काटे की टक्कर निवडणूक झाल्याचं दिसलं आहे. आता बिहारमध्ये एका ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वडील आणि मुलगा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

बिहारमधील पुर्व चंपारणच्या सरैया गोपाल निवडणुकीकडे सर्वांचचं लक्ष लागलं होतं. अंशू सुरेश सिंह नावाच्या व्यक्तीने थेट वडिलांविरोधात निवडणूक अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये सरपंच पदाकरिता सात जणांनी अर्ज केला होता. यामध्ये स्वत: च्या मुलासह इतर सर्व उमेदवारांना पराभूत करत सुरेश सिंह यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. ‘बाप बाप होता है और बेटा बेटा होता है’ हे सुरेश सिंह यांनी दाखवून दिलं आहे.

सुरेश सिंह हे आता विद्यमान सरपंच आहेत. सरपंचपदाची निवडणूक त्यांनी जिंकली असून त्यांचा थोरला चिरंजीव अंशू सिंहला चितपट केले आहे. सुरेश प्रसाद सिंह यांना एकूण 1386 मते मिळाली आहेत तर त्यांचा मुलगा अंशू सिंहला केवळ 149 इतकीच मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेश प्रसाद सिंह यांना 1340 इतकी मते मिळाली आहेत.

दरम्यान, या निवडणुकात अंशू सिंह हा सहाव्या स्थानावर आहे. अंशू सिंह आणि सुरेश सिंह यांच्यात कौटूंबिक वाद होता.सुरेश सिंह यांचा धाकटा मुलगा भाजपचा नेता असून ठेकेदार देखील आहे. लहान मुलगा जास्त लाडका असल्याचा राग अंशू सिंहला होता. त्यामुुळेच त्याने वडिलांविरूद्ध निवडणूक लढवली होती.

थोडक्यात बातम्या-

‘किंग खान’चा जलवा कायम! ड्रग्स प्रकरणात मुलगा तुरूंगात पण…

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“राजकारण आता व्यापार झालाय, खऱ्याच्या बाजूने कोणीही बोलत नाही”

इम्रान खानच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी भिडले

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत किरण गोसावी लखनऊमधून फरार

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More