बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आठवण करून देतोय, बाप बाप असतो!’; रामदास कदमांच्या बॅनरबाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

ठाणे | किरीट सोमय्या यांच्या महाविकास आघाडीवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेना नेत्यांवर सुद्धा किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांना शिवसेना नेत्यांविरोधात आरोपांसाठी रसद पुरवल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर आहे. परिणामी रामदास कदम समर्थकांच्या बॅनरबाजीची राज्यात सध्या जोरदार चर्चा होत आहे.

ठाण्यातील नितीन कंपनीच्या चौकात रामदास कदम समर्थकांनी बॅनर लावली आहेत. या बॅनरवरून शिवसेना गायब असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत त्यांना आठवण करून देतो बाप बाप असतो, असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.

रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. बऱ्याच दिवसांपासून ते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. दसरा मेळाव्याला सुद्धा रामदास कदम हे तब्येत बिघडल्याचं सांगत हजर नव्हते. परिणामी शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांना मदत केल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. अशातच आता या बॅनरबाजीनं रामदास कदम प्रकरण राज्यात गाजत आहे.

दरम्यान, शिवसेनेत रामदास कदम यांचं वजन कमी झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप न करता फक्त किरीट सोमय्या यांच्या नावासोबत नावं जोडल्यानं रामदास कदम अडचणीत आले आहेत.

थोडक्यात बातम्या 

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More