बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या

नागपूर | घरात होणाऱ्या वादांचा नेहमी घरातील लहान मुलांवर परिणाम होतो, असं म्हणतात. मात्र हा परिणाम आता जिवघेण्या पर्यंत पोचल्याचं दिसून येत आहे. नागपूर येथे एका जोडप्यात झालेल्या भांडणाच्या रागात वडिलांनी आपल्याच लहान लेकीचा ब्लेडने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील गणेशपूर गावात एका सयाम आडनावाच्या जोडप्यामध्ये काही कारणांमुळे वाद पेटला. या वादाची तक्रार नोंदवण्यासाठी पत्नी पोलीस ठाण्यात गेली होती. या गोष्टीचा तीच्या पतीला भयंकर राग आला त्याने रागाच्या नादात त्याच्या दोन वर्षाच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला. क्रूरपणे अंत झालेल्या या चिमुकलीचं नाव राधीका किशोर सयाम असं आहे.

या घटनेमुळे संपुर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली आहे.  पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आपल्या पोटच्या मुलीची हत्या करण्याची ही पहिली घटना नाही. तर या आधीसुद्धा गोंदीया येथे एका पाच वर्षाचा मुलीने खाऊसाठी पाच रुपये मागिले होते. पैसे मागितल्याच्या रागात पित्याने तिला उचलून दरवाजावर फेकून तीची हत्या केली होती. विवेक उईके असं आरोपीचं नाव होतं तर मृत झालेल्या मुलीचे नाव वैष्णवी असं होतं.

थोडक्यात बातम्या-

“…हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना”

धक्कादायक! मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण फिरतांना आढळले

शरद पवारांपाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही घेतली कोरोनाची लस

‘शेंबड्या पोरानं केंद्रीय मंत्र्याला ठोकलं’; लेकाचं कौतुक करत हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला

भररस्त्यात गाईचा जलवा; व्हिडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More