बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक दोन नव्हे तर 3 वेळा MPSC पास केली, पण मोनिका म्हणते, ‘जिल्हाधिकारी होयचंय’!

पुणे | आपल्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी अनेक तरूण तरूणी स्पर्धा परीक्षेकडे वळतात. अधिकारी होण्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून अनेकजण परीक्षेची तयारी करत असतात. अफाट मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा कोणीही पास होऊन अधिकारी होऊ शकतो, हे पुण्याच्या मोनिका कांबळेने दाखवून दिलं आहे.

नुकताच काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. 2019 ला झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुण्याच्या पर्वतीमधील सफाई कामगाराची मुलगी असलेल्या मोनिका कांबळेने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे. मोनिकाचे वडील हे पेशानं सफाई कामगार आहेत.

मोनिकाने याआधी 2018 मध्ये उपमुख्यधिकारी पदावर निवड झाली होती. तर, 2019 मध्ये राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. तसेच 2020 मध्ये मोनिकाची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेली होती. आता मोनिकाची तहसीलदारपदी वर्णी लागल्यावर कुटुंबियांसह शेजारील नागरिक तिच्यावर कौतूकाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, जिद्दीने आणि मेहनतीच्या जोरावर हमखास यश मिळते, असं मोनिकानं म्हटलं आहे. मोनिकाने एका वृत्तसमुहाला मुलाखत दिली आहे. तसेच मोनिकाचं अधिक चांगला अभ्यास करून जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मला पुन्हा नजरकैदेत ठेवलंय, मला बाहेर पडू दिलं जात नाही”

नेताजी पडले! भर कार्यक्रमात भाजप नेता स्टेजवरून कोसळला; पाहा व्हिडीओ

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा; सुप्रिया सुळेंकडून तोंडभरून कौतूक

मोदी सरकारची नवी घोषणा! सरकारी शाळेतील मुलांसाठी राबवणार ‘ही’ खास योजना

“आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर कारवाई करणार का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More