बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी एका तरुणीचा लैंगिक छळ झाल्याची माहिती तिच्या पित्याला समजते. ही माहिती समजताच तरुणीच्या वडिलांनी काळजाचा थरकाप करणारं कृत्य केलं आहे.

विशाखापट्टणम जिल्ह्यातील जट्टादा गावातील ही घटना आहे. येथील एका तरुणीवर एका मुलाने बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती तरुणीच्या वडिलांना समजली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाचे थेट घर गाठलं. मुलीचे वडिल जेव्हा आरोपीच्या घरी पोहचले तेव्हा आरोपी तेथून फरार झाला.

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित आरोपी फरार झाला तरी तरुणीच्या वडिलांनी त्याच्या घरातील सहा जणांची हत्या केली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसर हदरून गेलं आहे. तसेच पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना अटक देखील केली आहे.

दरम्यान, या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीचा शोध घेण्याचा देखील पोलिस प्रयत्न करत आहेत. समाजातील मुलींवरचे लैगिंक अत्याचार जर कमी झाले नाहीत तर मुलीच्या प्रेमापोटी बाप कोणत्या थरा पर्यंत जाऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणजे ही घटना असल्याचं म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह

अबब… बाॅसने छेडल्यानंतर मुलीने केला असा प्रतिकार; व्हिडीओ पाहुन व्हाल थक्क

“संजय राऊत हे गडकरींनाच काय अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात”

दिलासादायक! येत्या 5 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होणार

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More