Top News महाराष्ट्र मुंबई

“…म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला”

जळगाव | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झालं आहे. भाजपचे नेतृत्व कमी झालं आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला, अशी टीका खडसेंनी केलीये.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असा टोला खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे. असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही”

“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”

“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक

14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या