बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदी आधीच केंद्राकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्यानं लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र अजूनही कोरोना वाढण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं येत्या सणासुदीला राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सगळीकडे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारे सण-उत्सव सावधगिरीनं बाळगण्याचं सांगितलं आहे. याविषयी सरकारनं काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येणारे सण-उत्सव सावधगिरीने आणि सुरक्षितपणे साजरे करण्याची खात्री करण्यास सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, कोरोना रूग्णांची वाढ होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे पाळण्याची गरज आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता येणाऱ्या सण-उत्सव साधेपणानं साजरे करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सणासुदीमुळे आगामी काळात कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी आतापासूनच काळजी घेतली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More