नागपूर | नागपूरच्या गणेश पेठेत एक धक्कादायक घटना घडली होती. एका माणसाचा मृतदेह खुर्चीला बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याची गळा चिरून हत्या केली गेली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येच्या आरोपात मृतकाच्या पाचव्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
गेले काही दिवस लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकूल येथील एका फ्लाॅटवर राहत होते. 8 मार्चच्या संध्याकाळी लक्ष्मण याची पाचवी पत्नी स्वाती ही त्यांच्या फ्लॅटवर भेटायला गेली. तिनं मोबाईलमध्ये पाॅर्न व्हिडीओ दाखवून लक्ष्मणचे हात आणि पाय बांधले. पती रंगात येताच तिनं सोबत आणलेल्या धारदार चाकूनं त्याचा गळा कापला. पती मेल्याचं कळताच तिनं फ्लॅटवरून पळ काढला.
दुसऱ्यादिवशी पोलिसांना खून झाल्याची माहिती कळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. त्यानंतर मृृतकाला 5 पत्नी असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी सर्व पत्नीचे जवाब नोंदवल्यानंतर पाचव्या पत्नीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तिच्यावर संशंय आला. संशय बळावल्यानंतर अधिक चौकशी करून पोलिसांनी स्वातीला अटक केली आहे.
दरम्यान, लक्ष्मणचं हे स्वाती बरोबरचं पाचवं लग्न होतं. या दोघांना एक 8 वर्षाचा मुलगा देखील आहे. तर स्वातींन 3 महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं होतं. तर स्वातीचं बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध आहे, असा लक्ष्मणचा आरोप होता. त्यामुळे तो तिला पैसे देत नव्हता त्यामुळे त्यांची भांडण होत होती अशी माहिती स्वातीनं दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या –
संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव
मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले
“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
Comments are closed.