बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

नवी दिल्ली | गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना नक्षलवादाचा मुळापासून खात्मा करण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. येत्या एका वर्षात या समस्येचा लढा निर्णायक बनवण्याचे आदेश शहांनी दिले आहेत.

बैठकीत बोलताना अमित शहा म्हणाले की, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 200 वर आली आहे. पुढील एक वर्ष या समस्येला प्राधान्य द्यावे. जेणेकरून यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. यासाठी दबाव निर्माण करून वेग वाढवणे आणि उत्तम समन्वय साधणे गरजेचं आहे.

तसेच नक्षलवाद्यांना ज्या स्रोतांकडून मदत मिळते ते स्रोत बंद करणे गरजेचं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सीजने एकत्रित येऊन हे थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं देखील अमित शहा यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, या बैठकीला ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच आंध्र प्रदेश आणि केरळचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने त्या राज्यांच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याचं प्रतिनिधित्व केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पायातून रक्त वाहत असताना देखील CSKचा ‘हा’ खेळाडू खेळतच राहिला, फोटो व्हायरल

ईडीच्या चौकशीवेळी आनंदराव अडसुळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल केलं

जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?- गोपीचंद पडळकर

भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बाॅर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, फोटो व्हायरल

मुस्लिम लोकांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या बॅंड बाजासारखी झालीये- असदुद्दीन ओवैसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More