बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“योगी आदित्यनाथ म्हणजे राजकारणातील राम”

लखनऊ | पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात राजकीय वारे वाहू लागल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काही दिवसांपुर्वी दिल्लीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या मुद्द्यावर मोठी बैठक पार पडली. या बैठकीत योगी आदित्यनाथ हेच भाजपचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झालंय. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्या उत्तर प्रदेश राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री आणि विधानसभेचे कामकाज मंत्री सुरेश खन्ना यांनी योगी आदित्यनाथ यांचं तोंडभरून कौतुक केलंय. योगी आदित्यनाथ हे राजकारणातील राम आहेत, ते आसुरी शक्तींचा पराभव करण्यासाठी इथं बसले आहेत, असं वक्तव्य सुरेश खन्ना यांनी केलंय. त्यावेळी सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या या वक्तव्यावर आनंद व्यक्त करत बाका वाजवल्या. तर योगी आदित्यनाथ देखील खन्ना यांच्या वक्तव्यावर हसताना दिसले. त्यानंतर विरोधीपक्षाने अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि सभागृहात गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला  आहे. तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील सडकून टीका केली.

दरम्यान, योगी आदित्यनाथ राजकीय दृषट्या ऋषी नाहीत, तर ते एका आचार्य पिठाचे प्रमुख आहेत, असं राम चौधरी यांनी म्हटलं. आगामी निवडणुकीवर लक्ष ठेऊन भाजपने अर्थसंकल्प मांडल्याच्या आरोप देखील त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे”

शिवसेनेला मोठा धक्का, आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेला ‘हा’ चेहरा भाजपमध्ये!

“युतीत असताना आमचा श्वास कोंडत होता, आता मोकळा श्वास घेतोय”

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More