बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल

मुंबई | काेरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास मुंबई महापालिकेने  1000 रूपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही थुंकोबांची सवय काही गेली नाही आणि काल मुंबई महापालिके केलेल्या कारवाईत थुंकोबांना आपला खिसा खाली करावा लागला.

काल मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यानंतर एका दिवसात 111 जणांवर कारवाई करत 46 जणांना सावधान केलं म्हणजेच वारनिंग दिली. तर 111 जणांकडून तब्बल 1 लाख 11 हजार रूपये इतका दंड वसुल करण्यात आला.

आता प्रत्येत तासाला थुंकोबांची संख्या मोजण्यात येणार असून त्या आकड्याचं प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास याआधी 200 रूपये इतका दंंड आकारण्यात येत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पटीने हा दंड वाढवण्यात आला असला तरीही मात्र थुंकोबांना काही त्याचं गांभीर्य नसल्याचं यातून दिसून येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रात ‘देऊळ बंद’ पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा राहणार उघडा

कोरोनाला घालवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल

पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव; दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More