पुणे | सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी परिसरातील नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती.
संध्याकाळी 7 वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.
वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय.
संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य विभागाने केली ‘ही’ मोठी कारवाई!
“सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?, या घटनेची चौकशी झाली पाहिजे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचे मृतदेह सापडलेत- राजेश टोपे
“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत मुक्ता टिळक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…