Top News पुणे महाराष्ट्र

देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना

पुणे | कोरोनाच्या प्रतिकारासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या ‘कोविडशल्ड’ लसीच्य पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. आज सकाळी पहाटे 4. 50 च्या सुमरास हे ट्रक रवाना झाले.

पोलिसांच्या सुरक्षेत हे ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचवण्यात आले. तिथून कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.

पोलिसांनी आधी लस घेऊन जाणाऱ्या गाडीची पुजा केली. केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.

दरम्यान, या लसीचा वापर हा पहिल्या टप्यात कोरोमा योद्ध्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यातील 65 लाख डोस इतर राज्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

 नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार

वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवी

थोरली CA तर धाकटी UPSC उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?

तानाजी चित्रपटाला एक वर्ष पुर्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळक

लसीच्या सुरक्षेबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी- राष्ट्रवादी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या