बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

नवी दिल्ली | देशात ग्रीन फंगसने शिरकाव केला आहे. देशात ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्ये ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये हा ग्रीन फंगस आढळून आला आहे.

ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण सापडला. यापूर्वी या रुग्णाला कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्ण नुकताच कोरोनामुक्त झाला होता. सध्या त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे, जालंधर जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचे साथीचा रोग विशेषज्ञ, डॉ परमवीर सिंग यांनी सांगितलं आहे.

रुग्णाला खोकला सुरु झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच रुग्णाच्या छातीतही वारंवार दुखत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार माजवलेला असतानाच आता कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. तसेच देशातील जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करून हे मोठं आव्हान आहे. कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन लसींच्या दरम्यान गॅप वाढवण्यात आला आहे. ते चुकीचं नाही. उलट त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार आहे, असं रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या- 

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गरज असेल तरच घराबाहेर पडा, नियमांचं पालन करा- अजित पवार

राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार- पंकजा मुंडे

‘आदित्य दादा, राजगडावर रोपवे बांधू नका’; चिमुकल्या गडप्रेमीचं पर्यटनमंत्र्यांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More