बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

पुणे | राज्यात झिका विषाणूचा पहिला रूग्ण पुण्यात सापडला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

झिकाचे पहिलं लक्षण म्हणजे ताप येणं, अंगदुखणं, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणं तसेच या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरसचे प्रमुख लक्षण असल्याची माहिती समोर आहे. सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात.

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे.

झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असलेल्या बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला अलविदा!

महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

श्रीलंका दौरा संपवून भारतात परतणाऱ्या ‘या’ 3 भारतीय क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकारली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More