उत्तर प्रदेश | संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणारे. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात.
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. आणि उत्तर प्रदेश हे कोरोनाच्या लसीकरणाला करणारं देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
यासाठी उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून एक पत्रकंही जारी करण्यात आलंय. या पत्रात 20 डिसेंबर ते 21 जानेवारी या काळात लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचं नमूद करण्यात आलंय.
दरम्यान या लसीकरणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची मदत फार आवश्यक आहे. म्हणूनच सरकारी कर्मचारी, नर्सेस तसंच कंत्राटी कर्मचारी यांच्या सुट्ट्या 31 जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही पत्रात सांगण्यात आलंय.
थोडक्यात बातम्या-
राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार
‘चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही’; स्वरा भास्करचा कंगणाला टोला
“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”
“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”
उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप