भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

चीन | भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचं अजिंक्यपद मिळवलं आहे. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. 2018 मध्ये सिंधूचं हे पहिलं अजिंक्यपद ठरलं आहे.

अंतिम फेरीत सिंधूनं नोझोमी ओकुहारावर मात केली आहे. 21-19, 21-17ने सिंधूनं आपला अंतिम फेरीचा सामना जिंकला आहे.

मागच्या मोसमात ओकुहारानं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला होता. 

दरम्यान, हे विजेतेपद पटकावून सिंधूनं 2018 च्या खेळाचा शेवट सुवर्णपदकाची कमाई करत केला आहे. या दोघांमध्ये एकूण 13 मॅच झाल्या आहेत. यामध्ये 7 मॅचमध्ये सिंधूचा विजय झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती

-…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

-कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!

-रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!

-भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

Google+ Linkedin