बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पहिला Omicron बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाला

मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या आता कमी होत असतानाच जगभर कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या Omicronने धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. Omicronची ही रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशातच आता महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती समोर येत आहे.

दोन आठवड्यापूर्वी डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून 22 नोव्हेंबरला आलेला Omicron बाधित रुग्ण सापडला होता. आता तो रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता डाॅक्टरांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे.

डोंबिवलीत रूग्णाचा आज Omicronचा आणि कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर त्याला 7 दिवस घरातच विलीगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान,राज्यात ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. अगोदरच राज्यात 10 रूग्ण आढळले होते. अशातच आता आज आणखी 10 रूग्ण आढळलं आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता ही रूग्णसंख्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार की काय , अशी चिंता आता व्यक्त होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमचं हेलिकाॅप्टर असंच ढगामध्ये सापडलं होतं…”; शरद पवारांनी सांगितला किस्सा

अपघात की घातपात? निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन म्हणतात, “चीनने हा…”

राज्याचं टेन्शन वाढलं! Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

आधीही असंच घडलं होतं! 6 वर्षापूर्वी ‘त्या’ अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते

‘अजिंक्य’पर्व संपण्याच्या वाटेवर?, कसोटी संघाचं उपकर्णधारपद गमावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More