बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राज्यात आढळला Omicronचा पहिला रूग्ण

मुंबई | कोरोना (Corona) महामारीशी गेली दीड वर्ष झालं अवघं जग लढत आहे. अशात या दीड वर्षात वेगवेगळ्या नवीन व्हेरियंटनं (New Veriant) अनेकदा धुमाकूळ घातला आहे. आता सध्या ओमिक्राॅन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरियंटनं सर्वत्र चिंता निर्माण केली आहे. आतापर्यंत देशात तीन रूग्ण सापडले होते. महाराष्ट्रात या व्हेरियंटचा पहिला रूग्ण डोंबिवलीमध्ये सापडला आहे.

24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून (Cape Town ) भारतात परतलेल्या एक व्यक्तीमध्ये ओमिक्राॅनची लक्षण आढळली आहेत. या तरूणानं दुबई मार्गे मुंबई (Dubai Via Mumbai) हा प्रवास केला आहे. प्रयोगशाळेतील तपासानंतर त्याच्यात ओमिक्राॅनची लक्षणं असल्याचं आढळलं आहे. 33 वर्ष हे या रूग्णाचं वय आहे. परिणामी सध्या सर्वत्र काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

देशात पहिल्यांदा कर्नाटकमध्ये दोन रूग्ण आढळले होते. त्यानंतर देशात खळबळ माजली होती. त्यानंतर गुजरातमध्ये एका वृद्ध व्यक्तीला लागण झाल्याचं उघड झालं होतं. आता महाराष्ट्रात हा रूग्ण आढळल्यानं प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. ज्या काही क्षेत्रात निर्बंध लावण्यात आलेले आहेत ते कायम ठेवण्यात आले आहेत. तर सर्वत्र आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे आदेश सरकारनं प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, कल्याण डोंबिवली भागात हा रूग्ण आढळल्यानं त्या रूग्णाच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाची चाचणी करण्यात येत आहे. या रूग्णानं लस घेतली नसल्याचं आता उघड झालं आहे. परिणामी सध्या लसीकरण करून घेण्यावर भर देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

“महाराजांच्या दरबारात शायरी व्हायची म्हणतात, ‘मुजरा’ व्हायचा म्हटले नाही हे नशीब”

Ajaz Patelची ऐतिहासिक कामगिरी! अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या विक्रमाशी बरोबरी

नारायण राणेंची सुरक्षा वाढवली; अटकेच्या कारवाईनंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More