बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

समीर वानखेडेंच्या बदलीवरुन नवाब मलिकांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे यांची बदली झाली तर त्यांच्याविरोधातील लढाई थांबणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वक्तव्य केलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, समीर वानखेडेंनी जो फर्जीवाडा केला, त्याच्या तक्रारी आम्ही केल्या असून आमच्या तक्रारींवर कारवाई सरू आहे. जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची पण चौकशी सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल आणि त्यांनी खोटं प्रमाणपत्र जमा केल्याचं समोर येईल.

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा होत असलेली पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

झाड फेकी प्रकरणावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

‘जर ते असते तर…’; झी मराठीच्या मंचावर पंकजा मुंडे भावूक, पाहा व्हिडीओ

अखेर समीर वानखेडेंची बदली; आता ‘या’ विभागाची जबाबदारी सांभाळणार

तो खूपच हाॅट आहे! कार्तिकनंतर सारा अली खान आता ‘या’ अभिनेत्यावर फिदा

पुन्हा सगळंं ऑनलाईन: ‘या’ भागात 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More