बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाच्या टीमची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने संपुर्ण बाॅलिवूडवर शोकांतिका पसरली आहे. ही बातमी ऐकून त्याचे चाहते देखील सुन्न झाले आहेत. सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र सर्वात जास्त तो पसंतीस आणि चर्चेत आला ते म्हणजे ‘बिग बाॅस 13’ नंतर. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याच्या टीमने पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

सिद्धार्थ शुक्लाची पीआर टीम ‘Brand N Buzz’ यांनी सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिली प्रतिक्रिया देत सिद्धार्थला त्याच्या आयुष्यात नेहमीच गोपनीयता बाळगणं महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळे मीडिया विचार करेल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सिद्धार्थच्या कुटुंबातील लोकांना आणि निकटवर्तीय यांना थोडा वेळ द्या, अशी विनंती पीआर टीमने केली आहे.

सर्वांना धक्कादायक बातमी समजली असून आम्ही देखील मोठ्या धक्क्यात आहोत, तसेच त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या आयुष्याच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी विनंती देखील या पीआर टीमने केली आहे. सिद्धार्थचा अकाली मृत्यू काहींच्या जिव्हारी देखील लागला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिल यांची जोडी बिग बाॅसमध्ये असताना बनली होती. त्यानंतर ही जोडी लोकांच्या प्रचंड पसंतीस आली. सिद्धार्थ आणि शेहनाजचा सोशल मीडियावर इतका क्रेझ वाढला की चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाज’ असं नाव देत हॅशटॅग देखील ट्रेंडिंग होत होतं.

थोडक्यात बातम्या-

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More