बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

नांदेड | नांदेड येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका कुख्यात गुंडाची जामिनावर सुटका झाली होती. मात्र सुटकेनंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. यावेळी अतिशय थरारक पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली आहे. संबंधित कुख्यात गुंडाचे नाव विक्की ठाकूर असं आहे.

नांदेड येथील गुंड विक्की ठाकूर हा कुख्यात गुंड विक्की चव्हाण याचा साथीदार होता. एका वर्षापूर्वी कैलास बिगानिया नावाच्या गुंडाने विक्की चव्हाणची हत्या केली होती. अशातच विक्की ठाकूर तुरुंगाबाहेर आल्यानंतर मंगळवारी रात्री तो आपल्या घराबाहेर उभा असताना दोन बाईकवरुन आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला.

बाईकवरुन आलेल्या गँगने विक्कीवर गोळीबार केला मात्र विक्की तो नेम चुकवून धावू लागला. अशातच पाच जणांनी विक्कीचा पाठलाग करत त्याच्यावर पुन्हा एकदा गोळीबार केला. यादरम्यान विक्कीवर तीन गोळ्या झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पाच जणांनी पुन्हा त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले, यामध्ये विक्की जागीच ठार झाला.

दरम्यान, विक्की चव्हाणचा खून केलेल्या कैलास बिगानियाच्या लोकांनीच विक्की ठाकूरचा देखील खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र अद्याप आरोपींची माहिती समोर आली नसून पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More