आता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट!
नवी दिल्ली | आजच्या इंटरनेट युगात बरेच व्यवहार ऑनलाईन केले जातात. इंटरनेट आता मानवी गरजांचा अविभाज्य भाग बनला आहे. दररोज कित्येक लोक वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देतात. आयटी क्षेत्रात दररोज कित्येक वेबसाईट तयार केल्या जातात. आयटी क्षेत्रात भारतीयांचा डंका जगभर वाजवला जातो पण अजूनही एकाही भारतीय भाषेत वेबसाईटचं डोमेन नेम नव्हतं. आता भारतातली पहिली हिंदी वेबसाईट तयार केली गेली आहे, जिचं डोमेन हिंदीत आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक विनय मोरारका यांनी भारतातील पहिली आणि एकमेव अशी वेबसाईट तयार केली आहे. ‘https://मेरा.भारत’ असं या वेबसाईटचं नाव आहे. विनय मोरारका हे ‘व्ही 2 टेक्नोसिस’ या कंपनीचे मालक आहेत. फक्त वेबसाईटचं नव्हे तर या वेबसाईटचे ‘डोमेन नाव’ सुद्धा हिंदीतून दिलं गेलं आहे. याशिवाय हिंदीत डोमेन नाव असणारी ही पहिलीच वेबसाईट असेल.
या वेबसाईटवर पर्यटन, इतिहास, धर्म, राज्य व त्यांची धोरणे, राज्यातील विविध पर्यटन क्षेत्राची माहिती दिली गेली आहे. या वेबसाईटचा उद्देश हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ‘वोकल फाॅर लोकल’ योजनेला हातभार लागणार आहे. आतापर्यत कोणत्याही वेबसाईटचा डोमेन हिंदीत नव्हता. या वेबसाईटचे डोमेनच या वेबसाईटचे वैशिष्टय आहे, असं विनय मोरारका यांनी म्हटलं आहे.
देशातील साहित्य, संस्कृती आणि कलांना प्रोत्साहन देण्यासाठी विनय मोरारका Bookyour.in ही वेबसाईट चालवतात. त्यावरुन कोणालाही डोमेन नोंदणी करु शकतात. हिंदी भाषेतील ही वेबसाईट नाविन्यपुर्ण आहे. या प्रयोगामुळे इतर भाषेत आणि मराठीत देखील लवकर वेबसाईट पहायला मिळू शकेल.
थोडक्यात बातम्या-
“आज महाराज असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”
ब्रेकिंग न्यूज- पुण्यासह इतर महापालिका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार
मी कंबर हालवत बसत नाही तर सरळ हाडं तोडते- कंगणा राणावत
15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…
Comments are closed.