मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये, अजित पवार म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मागील चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलं आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का?, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.

एवढं बील कसं काय? जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?, असा खोचक सवाल पवार (Ajit Pawar) यांनी केला.

विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत, असं अजित पवार म्हणाले.

एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-